सावंतवाडी भूमी अभिलेख उपअधीक्षक पदाचा विनायक ठाकरे यांनी स्वीकारला पदभार…!

सावंतवाडी : सावंतवाडी भूमी अभिलेख उपअधीक्षक पदी विनायक रामदास ठाकरे हे आज रुजू होऊन त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ठाकरे हे पुणे शिरूळ येथे कार्यरत होते. सावंतवाडी भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यरत असलेल्या प्रियदा साकोरे यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागी ठाकरे यांची नियुक्ती झाली आहे.पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी नरेंद्र शिर्के,प्रणित आडेलकर,संदीप सावंत,संजय गोसावी,प्रशांत राणे, विक्रांत तावडे,पल्लवी सावंत आधी उपस्थित होते.