सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून सावंतवाडी मध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे . मोचा वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत . वादळी वाऱ्यासह पावसाळी हवामान थांबेपर्यंत मच्छीमारांनी सावधगिरी बाळगावी तसेच मासेमारी नौका , जाळी , इंजिन आदी मासेमारीची साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत , अशा सूचना मत्स्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत . मोचा वादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात बदललेल्या स्थितीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या पर्यटकांना देखील बसला आहे . स्कुबा डायविंग सह समुद्रातले साहसी खेळ बंद करण्यात आले आहेत .





