बांदा — श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पाडलोस यांनी मंदिर परिसरात बैठक व्यवस्थाकरीता करुन स्तुत्य उपक्रम राबवला आहे.
आजकाल क्रिकेट हा जागतिक दर्जाचा खेळ म्हणून या खेळाकडे सिंधुदुर्गातील तरुणाई आकर्षित होत आहे. या खेळाच्या माध्यमातून मोठमोठी बक्षिसे लावली जातात. समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून फंडिंग होत आहे.परंतु या मंडळांच्या माध्यमातून जी उलाढाल होते ती फक्त आणि फक्त हौस आणि मजा हा दृष्टिकोन न ठेवता समाजोपयोगी उपक्रम राबवले तर गावच्या विकासात या तरुण मंडळांचा सहभाग होऊ शकतो असे मत निहार गावडे यांने व्यक्त केले.श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पाडलोसच्या वतीने सिमेंटच्या दोन बैठका उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच मळेवाड- कोंडुरा ग्रामपंचायत उपसरपंच तसेच आमचे राजकीय मार्गदर्शक आणि मित्र हेमंत मराठे यांचे कडून रुपये साडेचार हजार किमतीची एक बैठक निहार गावडे यांनी मिळवून दिल्याबद्दल हेमंत मराठे व निहार गावडे यांचे मंडळाने आभार मानले.या कामी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते सुधीर गावडे, गोविंद माधव,राघोबा गावडे, सौरभ गावडे, बंटी गावडे, महादेव उर्फ गोट्या गावडे संदीप गावडे, योगेश गावडे, प्रणेश गावडे, मुकुंद गावडे,विशाल गावडे, तुषार गावडे, रोहन गावडे, जयेश गावडे, हर्गो गावडे, सुनिल गावडे आणि इतर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. देवस्थानचे मानकरी सदानंद गावडे,आनंद गावडे व विजय गावडे यांनी मंडळाचे आभार मानले.मंडाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावातून मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे





