सिंधुदुर्गनगरी : येथील नामांकित असलेल्या परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते शरद कृषी भवन येथे सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कोकणात आणि दक्षिण भारतात नीट व जेईई परीक्षांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या परफेक्ट अँकॅडेमीचे संस्थापक प्रा. राजाराम परब यांनी अल्पावधीत हजारो विद्यार्थ्यांना घडवून शैक्षणिक क्षेत्रात विधायक कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत रविवारी येथील कृषी भवनात प्रा. राजाराम परब यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले,
धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर शशिकांत हेर्लेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्गच्या सौ. एम. एस. निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव डी. बी. म्हालटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, साहस डिसॲबिलिटी रिसर्च अँड केअर फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संस्थापक डॉ. नसीमादीदी हुरजूक, व्हिक्टर डांटस, अटल प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष
अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, फादर मनवेल डिसिल्वा, धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक अरुण भुईंबर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. परब यांना गौरविण्यात आले.





