रवींद्रनाथ टागोर श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात विजयदुर्गचा यशोधन देवधर करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व..!

56

देवगड : राष्ट्रीय नेते रवींद्रनाथ टागोर यांच्या श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम दिल्लीमध्ये मंगळवार ९ मे २०२३ रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग मधील यशोधन प्रसाद देवधर यांची निवड झाली आहे .हा कार्यक्रम संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे अशी माहिती नेहरू युवा केंद्राकडून देण्यात आली.
नेहरू युवा केंद्र संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील सर्व राज्यांमधून प्रत्येकी एक असे २८ उमेदवार निवडण्यात येतात या निवडलेल्या २८ उमेदवारांमधून २५ जणांची परीक्षकांमधून निवड झाली. त्यांना संसदेतील कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळते. संपूर्ण भारतातून निवडलेल्या २५ पैकी ७ जणांना सेंट्रल हॉलमध्ये बोलण्याची संधी मिळणार आहे.यशोधनने ८ व रँक गाठला आणि त्याला प्रतीक्षा वक्ता म्हणून नामांकन मिळले आहे. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील यशोधन प्रसाद देवधर हे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या विजयदुर्ग गावच्या सुपुत्राची ही झालेली निवड म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यशोधनच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.