राजापूर : बारसूच्या आंदोलकाना भेटण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरचे कोंबे (राजापूर) येथे लॅडींग झाले. त्यावेळी खा. विनायक राऊत आ. वैभव नाईक यांच्यासह सेनेच्या नेत्यानी त्यांचे जोरदार स्वागत त्यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार घोषणानी परीसर दणाणुन गेला.
स्वागतानंतर उध्दव ठाकरे बारसूकडे रवाना झाले. बारसुतील प्रकल्पग्रस्त जनतेची भेट घेतल्यानंतर त्यांनी परीसरातील कातळशिल्पांची पहाणी केली . आ. राजन साळवीनी त्यांचे स्वागत केले. उध्दव ठाकरेंसमवेत विधान परीषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि अन्य उपस्थीत आहेत.





