राजापूर : राजापूर पोलिस स्टेशन च्या हद्दीत होत असलेल्या रिफायनरी सदर्भात आज समर्थनार्थ तसेच प्रकल्प विरोधी एक मेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५० अधिकारी तर १९०० कर्मचारी srpf तसेच शीघ्र कृती दलाच्या तुकड्या असणार आहेत. राजापूर शहरासहित रिफायनरी ठिकाणीं मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा येथील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे….. राजापूर पंचक्रोशीतील रिफायनरी समर्थक याच जवाहर चौकात येणार आहेत….. त्यानंतर समर्थक प्रमोद जठार, निलेश राणे, नितेश राणे यांच्या नेतत्त्वाखाली राजापूर रिफायनरी समर्थनार्थ राजापूर तहसीलदारांना निवेदन देणार आहेत….. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौज फाटा जवाहर चौक ते तहसीलदार कार्यालय पर्यंत तैनात करण्यात आला आहे….





