सिंधुदुर्ग : सिंधू संजीवन संस्था (नियोजित) सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलच्या सहकार्यातून सिंधुदूर्ग जिल्हा स्थापना दिन व सिंधुदुर्ग ग्रामीण पर्यटन भ्रमंती जागर यासाठी जिल्ह्यातील निसर्ग प्रेमिकांना माझ्या गावाक येवा या विषयावर गावातील पर्यटनावर फेसबुक उत्कृष्ट रील आणि उत्कृष्ट फोटो क्लिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
तसेच जिल्ह्यातील महीला बचत गटांसाठी महीला विशेष अंतर्गत महीला बचत गट सन्मान पुरस्कार 2023 याचे देखील आयोजन करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी व महीला बचत गटांनी यात भाग घेऊन कोकण नैसर्गिक रीत्या कीती सुंदर आहे आपले गाव किती सुंदर आहे हे दाखवून द्यावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी नियम खालील प्रमाणे रील / फोटो पाठविण्याचा अंतिम दिनांक :- 12/05/2023 ( रात्री 12.00 वाजेपर्यंत) प्रसारण दिनांक :- 14/05/2023
लाईक्स करण्याचा कालावधी :
दिनांक 14/05/2023 ते 22/05/2023 ( रात्री 12.00 )
स्पर्धेचा निकाल :- दिनांक 25/05/2023 जाहीर केला जाईल.यासाठी पारितोषिके
पहील्या 3 विजेत्यांना आकर्षक बक्षिस, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र ( प्रेक्षक पसंतीच्या आधारे ),विशेष रील सन्मान पुरस्कार ,इतर सर्व स्पर्धकांना आॕनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल .स्पर्धकांनी आपली माहिती पाठविण्यासाठी मोबाईल 8767986987 या नंबरवर व sindhusanjivan@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा.
https://www.facebook.com/profile.php?id=100091836415003





