भरधाव वेगाने डंपर चालविल्या प्रकरणी डंपर चालकावर कारवाई..!

85

देवगड : देवगड तालुक्यातील खुडी पन्हाळवाडी येथील तुषार अनंत धुरी (३०) हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन सकाळी ८ वा सुमारास दाभोळे ते दाभोळ तिठा या मार्गावर भरगांव वेगाने डंपर चालविल्या प्रकरणी देवगड पोलीस नाईक अमित हळदणकर यांनी डंपर चालकावर कारवाई केली आहे.
देवगड नांदगाव मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ सुरू असून दाभोळ ते दाभोळे तिठा या रस्त्यावर भरगाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी भादवि कलम २७९ व मोटर ॲक्ट १८४ प्रमाणे डंपर चालक तुषार धुरी यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.