सिंधुदुर्गनगरी : कोकण ही अलौकिक बुद्धिमान असलेल्या व्यक्तींची भूमी आहे. अनेक दिग्गज व देशाचा नावलौकिक वाढविणारे व्यक्ती कोकणाने दिलेले आहेत. प्राध्यापक राजाराम परब देखील असेच व्यक्तिमत्व आहेत. परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून प्रा. राजाराम परब सर्वोत्तम डॉक्टर्स व इंजिनियर्स घडवीत आहेत, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असून परफेक्ट अकॅडेमीचे हे निरंतर कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी येथे व्यक्त केले.
परफेक्ट अकॅडेमीच्या सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य शाखेत त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पुंडलिक दळवी उपस्थित होते.
यावेळी अर्चना घारे – परब व पुंडलिक दळवी यांचे परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब यांनी सन्मानचिन्ह व बुके देऊन स्वागत केले.
यादरम्यान सिंधुदुर्गनगरी येथील परफेक्ट अकॅडेमीच्या शाखेचे सुरू असलेले कार्य अर्चना घारे – परब यांनी जाणून घेतले. तसेच येथील विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी त्यांनी सुसंवाद साधला.
दरम्यान प्रा. राजाराम परब यांच्या आजपर्यंतचा कार्याचा शाब्दिक गौरव करीत सौ. घारे – परब म्हणाल्या की, प्राध्यापक परब आणि त्यांची परफेक्ट अकॅडेमीची टीम ही निश्चितच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तमरित्या घडविण्याचे कार्य करीत आहे. अतिशय माफक व सामान्य पालकांनाही परवडेल अशा फी मध्ये परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीट व जेईई अशा महत्त्वाच्या परीक्षांचे मार्गदर्शन केले जात आहे. हे कार्य निश्चितच अभिमानास्पद असून पालक व विद्यार्थ्यांनी आता जिल्ह्यातच राहून अशा परीक्षांची तयारी करून घ्यावी व परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या अशा सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन अर्चना घारे – परब यांनी केले.





