कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील हॉटेल वक्रतुंड समोर बोलेरो पिकअप टेम्पोने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगड – पाटगाव वरची गुरववाडी येथे जात असताना टेम्पो क्रमांक ( एम. एच. ०७ ए. जे. २९४५ ) हा पलटी होऊन भीषण अपघात झाला. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा झाला. या टेम्पोतून साधारणपणे ४५ जण प्रवास करत होते. त्यापैकी २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना गोवा – बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविले आहे तर १० अपघात ग्रस्त रुग्णांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल केले आहे. टेम्पो चालवणारा टेम्पो चालक मद्यपान करून टेम्पो चालवत असल्याची माहितीही समोर आली आहे. टेम्पो चालक गुरुनाथ काशिराम गुरव (वय – २७) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाडगाव येथे शिक्षिका श्रीम शिरोडकर यांच्या मुलाचे लग्न मंगळवारी कुडाळ येथे होते. त्या लग्नासाठी देवगड,पाटगाव येथील ग्रामस्थ या बोलेरो पिकअप टेम्पोतून गेले होते. लग्न आटोपून पुन्हा पाटगाव येथे टेम्पो (एम. एच. ०७ ए. जे. – २९४५) घरी जात असताना वागदे येथे रस्ता दुभाजकावर धडक बसून टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वागदे सरपंच संदीप सावंत, राजा पाटकर यांच्यासह नागरिकांनी जखमींना मिळेल त्या वाहनांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी रुग्णांची विचारपूस केली.

अपघातात जखमी रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात
यामध्ये अनंत धोंडु गुरव (वय – ५५ ), मनिषा महेश गुरव(वय – ३०), मनीषा रविंद्र गुरव ( वय -४६), सुनीता शिवाजी गुरव (वय – १७), सचिन सदाशिव गुरव(वय – ३०) प्रणिता विष्णू गुरव (वय – ५०) , रोशनी रमेश राघव (वय – २३), संजना संदीप गुरव (वय – २० ), विजया विजय गुरव (वय – ५०), अनिता सुरेश गुरव (वय – ५०), चिराग विनोद गुरव (वय – १२), विष्णू वामन गुरव (वय – ५२) या गंभीर जखमींना प्राथमिक उपचार कणकवली उपजिल्हा रुग्णालयात करुन ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय कणकवली दाखल जखमी रुग्णांमध्ये तेजा सुहास गुरव (वय -१२), सुचिता रामा गुरव (वय – ५५), सानिका संतोष गुरव(वय -३०), विजय शांताराम गुरव(वय -४५),दक्ष दिनेश गुरव (वय -१६), संजीवनी संदिप गुरव (वय -३०), अनिता लक्ष्मण गुरव (वय -३४), जयश्री नारायण गुरव (वय – ६०), सुषमा दिपक गुरव (वय -५५), अस्मी शिवाजी गुरव (वय -१२), विजय वसंत गुरव( वय – ४०), संस्कार तुकाराम गुरव (वय – १८), आरोही रविंद्र गुरव (वय – १०), शिवाणी शिवाजी गुरव (वय – ४०), रुपाली रामचंद्र गुरव (वय – ४०), बाबला सखाराम गुरव (वय – ६५), सुविधा बाबला गुरव (वय – ६०), अस्मीता अजय गुरव (वय – ४०), अनिता अनंत गुरव (वय – ४५), मानसी सुहास गुरव (वय – १९), सचिन वसंत गुरव (वय – ४३), महेश अन्तू गुरव (वय – ४०), प्रतिभा बाबू गुरव (वय – ४०), पार्थ जितेंद्र गुरव (वय – ९), कलावती काशिराम गुरव (वय – ५१), प्रियांका रामचंद्र गुरव(वय – २२), सविता बाबूराव गुरव (वय – ६०), स्मीता गुरव (वय – ५०)सिध्देश सिताराम गुरव(वय – २५), अनिता विजय गुरव(वय – ५५) तेजस्वी गुरव(वय – १३), मेघा मारुती गुरव( वय – ३६) गुरुनाथ काशिराम गुरव (वय – २७) चालक आदींचा समावेश आहे.
रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राकेश परब तसेच अमोल गोसावी, संजय कामतेकर, रंजन राणे, शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नीलम सावंत, सचिन सावंत, तेजस राणे आदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आले होते.
भीषण अपघातात जखमींना उपचारासाठी डॉ. बी. जी. शेळके, डॉ. मिलिंद म्हसकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिभा नाटेकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. सुहास पावसकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष चौगुले, डॉ. किर्लोस्कर, डॉ.धनंजय रासम आदींनी परिश्रम घेतले.
अपघाताची माहिती समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.





