कणकवली: बारसू प्रकल्पामुळे कोकणची बेरोजगारी दूर होऊन येथील आर्थिक विकास होणार आहे .त्यामुळे अशा प्रकल्पाच्या ठिकाणी जर विरोध होत होत असेल तर विरोधकांचे गैरसमज दूर करण्याचे सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले . दरेकर सिंधुदुर्ग मध्ये कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते . भाजपाची भूमिका नेहमी विकासाच्या दिशेने सकारात्मक राहिली आहे . या प्रकल्पातून येथील बेरोजगारी दूर होऊन कोकणचा विकास होणार आहे .बारसू येथील अनेक लोक या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेतअसे ते पुढे म्हणाले .





