दिव्यांगांचे मंजूर अनुदान देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई.!

111

कणकवली : जिल्‍हा परिषदेच्या ३ टक्‍के सेस मधून जिल्ह्यातील दिव्यांगांना अनुदान मंजूर झाले आहे. मात्र हे मंजूर अनुदान लाभार्थ्यांना देण्यात समाज कल्‍याण विभागाकडून दिरंगाई होत आहे.

दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी (कुक्कुटपालन खरेदीसाठीअर्थसहाय्य) अनुदान दिले जाते. . एकीकडे हे अर्थसाहाय्य अनुदान कमी प्रमाणात मिळत असून, या संदर्भात दिव्यांगांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील शासन स्तरावर केलेला आहे, असे असताना देखील शासनाने दिव्यांगांना शेती पूरक व्यवसाय कुक्कुटपालनसाठी मिळणारे ५०००० हजार रुपयांचे अनुदान हे केवळ १६००० हजार रुपयांवर ठेवले. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि त्यात कुकुटपिल्लांना खाद्यासाठी लागणारा खर्च पाहता हे अर्थसहाय्य अनुदान फारच कमी आहे. हे अनुदान मिळण्यासाठी मार्च २०२२ अखेरपर्यंत ज्‍या दिव्यांगांनी अनुदान अर्ज केले ते सर्व मंजूर करण्यात आले. दरम्‍यान हे अनुदान मिळण्यासाठी दिव्यांगांनी एका दिवसांत कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्‍यासाठी समाज कल्‍याण विभागा, पंचायत समिती विभागाने मोठी धावपळ देखील करायला लावली. परंतु अद्यापही हे अनुदान मिळालेले नाही. त्‍यामुळे मंजूर अनुदान देण्यास समाजकल्‍याण विभागाकडून दिरंगाई होत असल्‍याचा आरोप दिव्यांगांनी केला आहे.