देवगड : देवगड पवनचक्की येथील प्रकाश साटम यांनी दारूच्या नशेत आंब्याच्या झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. निदर्शनास आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड पवनचक्की साटमवाडी येथील प्रकाश आत्माराम साटम वय 55 राहणार पवनचक्की साटमवाडी यांनी मंगळवार 25 एप्रिल रोजी दारूच्या नशेत आंब्याच्या झाडास दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची खबर प्रकाशचे भाऊ आनंद आत्माराम साटम(वय 60) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.





