सावंतवाडी : मिशन आधार तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक उन्हाळ्यात पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी राबवण्यात येत असलेले मिशन जीवन आज सावंतवाडी मध्ये राबवण्यात आले.
याची सुरुवात शिव उद्यान सावंतवाडी येथून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर मळगाव घाट, शिल्पग्राम रोड, सावंतवाडी फिश मार्केट जवळ, आणि पाटबंधारे विभाग चराठा कॉलनी या ठिकाणी पाण्याची भांडी ठेवण्यात आली.
यावेळी जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष श्री. परिमल नाईक, माजी शिक्षक श्री. नाडकर्णी सर, सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी श्री. गजानन परब, पाटबंधारे विभाग कर्मचारी श्री. संदीप राणे व इतर कर्मचारी उपस्थित होते त्यांनी या मिशन आधार ला शुभेच्छा दिल्या आणि मिशन जीवन या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी मिशन आधार चे उपाध्यक्ष आनंद पुनाळेकर, प्रसाद नाडकर्णी, वैभव घाग, ऋषिकेश खानोलकर, वामन सावंत, तुषार रेमुळकर, ओमकार शिरोडकर, सोनाप्पा गवळी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.





