रत्नागिरी : बारसू सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामसभेच्या रिफायनरी विरोधी ठराव असूनही ग्रामस्थांना विश्वासात न घेता जमीन सर्वेक्षण करण्यास सरकार प्रचंड पोलीस बळाचा वापर करत आहे. या सर्वेक्षणाला २४ एप्रिल पासून सुरुवात करतील असं कळते. सर्वेक्षणापूर्वीच कोणतेही कारण न सांगता सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना कोणतेही करण न सांगता शनिवारी अटक करण्यात आली.
रविवारी रात्री पर्यंत तरी त्यांच्यावर कोणती कलमे लावली आहेत हे देखील कळले नाही. म्हणजेच त्यांना पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवले आहे असे म्हणावे लागेल. रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजता हाती आलेल्या माहिती नुसार त्यांना २५.११.२०२३ पर्यंत कोणतेही गुन्हे नसताना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले आहे.
ग्रामस्थांचा विरोध आणि ग्रामसभेचे रिफायनरी विरोध असूनही प्रचंड दडपशाही आणि पोलीस बळाचा वापर करून सर्व्हेक्षण करण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची अटक करून, संघटनेमधील इतर कार्यकर्त्यांना तडीपारीच्या, जिल्हाबंदीच्या नोटीसा बजावून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवण्याच्या हा प्रकार असल्याच भूमी अधिकार आंदोलनातर्फे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
तसेच सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांची तात्काळ सुटका करावी व जबरदस्ती चाललेले जमीन सर्वेक्षण रद्द करावे असंही प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटलं आहे.
खालील नावे असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे पत्रक काढलं आहे.
अशोक ढवळे,(अखिल भारतीय किसान सभा), ब्रायन लोबो (कष्टकरी संघटना), प्रतिभा शिंदे (लोक संघर्ष समिती) , मेधा पाटकर (नर्मदा बचाव आंदोलन / जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय), गिरीश भावे ,
उल्का महाजन (सर्वहारा जन आंदोलन)
मिलिंद चव्हाण (लोकशाही उत्सव समिती)
सीताराम शेलार (पाणी हक्क समिती)
सुरेखा दळवी (श्रमिक क्रांती संघटना)
दिलीप डाके (शोषित जन आंदोलन)
इंदवी तुळपुळे ( श्रमिक मुक्ती संघटना)
साथी सुभाष लोमटे/ जय किसान आंदोलन – स्वराज अभियान
: विलास भोंगाडे
कष्टकरी जन आंदोलन, नागपूर
श्याम गोहिल आणि अजित पाटील, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मा ले) लिबरेशन, महाराष्ट्र.
मानव कांबळे
नागरी हक्क सुरक्षा समिती
चयनिका शाह, संध्या गोखले
(नारी अत्याचार विरोधी मंच) दिनेश ऊर्फ दादा कुचेकर,टी यु सी आय पुणे





