बांदा येथिल सुषमा संदीप कामत यांचे निधन .!

101

बांदा : येथिल सौ.सुषमा संदीप कामत (52) यांचे गुरुवारी दि.20 एप्रिल रोजी सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.गुुरुवारी सायंकाळी बांदा स्मशानभुमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती , मुलगा, दिर , वहीनी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.बांदा येथिल नारळ व्यापारी विलास कामत यांच्या त्या वहिनी तर बांदा माजी उपसरपंच हर्षद कामत यांच्या काकी होत. त्यांच्या या अकाली निधनामुळे बांद्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.