सावंतवाडी मुख्य बाजार पेठेतील पार्किंग निश्चित करावे | बंटी पुरोहित यांची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी मुख्य बाजारपेठेत दुचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्या कारणाने शहरातील रहिवाशांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे. पार्किंगच्या जागेत फळ विक्रेते व काही भाजी विक्रेते जागा अडवून लोकांची गैरसोय करत आहेत. दुसऱ्या बाजूला गाडी लावल्यास लोकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे योग्य जागा निश्चित करावी अशी मागणी बंटी पुरोहित यांनी केलीय.