कुडाळ : मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीचे खेळाडू महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. ६५ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोथरूड पुणे येथे दिनांक १० ते १४ जानेवारी दरम्यान होत आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व मल्ल सम्राट प्रतिष्ठान सावंतवाडीचा पैलवान ललित हरमलकर (महाराष्ट्र केसरी गट ), नागेश सूर्यवंशी (९२ किलो), तेजस सुर्वे (६५ किलो), संकेत माळी (७० किलो), गणेश राऊळ (७९ किलो), बुधाजी हरमलकर (५७ किलो), ७. दशरथ गोंड्यालकर (६१ किलो), चेतन राणे (८ ६ किलो) आणि विघ्नेश बोन्द्रे हे करत आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष योगेश बेळगावकर, किशोर हरमलकर, किरण गोंधळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दाजी रेडकर, हर्षद मोर्जे यांचे मार्गदर्शन लाभले.





