मंत्री केसरकरांनी चुकीचं विधान हॉकर्स युनियनच्या माथी मारू नये | संघटनेचा इशारा

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील आठवडा बाजार डाॅ. स्वारांच्या दवाखान्या समोर हलवावा अशी मागणी हाॅकर्स फेडरेशनच्यावतीने मंत्री दिपकभाई केसरकर यांच्यांकडे कधीही केलेली नव्हती अशी प्रतिक्रिया हाॅकर्स फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर यांनी दिली.
जिमखाना मैदानाचा प्रस्ताव केसरकर यांनी हाॅकर्सच्या जनसमुदयासमोर दिला होता. त्यावेळी आम्ही यावर संघटनेच्या मिटींगमध्ये चर्चा करुन कळवतो असे सांगितले होते. मंत्री यांनी आपण न बोललेले शब्द माझ्या तोंडी घालून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करु नये असंही अॅड. निंबाळकर म्हणाले.
जिमखान्यावर बाजार भरवल्यास तेथील धुळ व माती भाजीपाला व इतर वस्तूवर बसते. यामुळे ग्राहक माल घेत नाहीत, तसेच पावसाळ्यात मैदानामध्ये पाणी साचल्यावर बाजार लावता येत नाही त्यामुळे जिमखाना मैदानाची जागा आठवडा बाजारासाठी गैरसोयीची आहे.
आम्ही मंत्री केसरकर यांना हाॅकर्स, प्रशासन, पोलिस, ग्राहक प्रतिनीधी व मंत्री अशी संयुक्त बैठक बोलवण्याची मागणी केली होती. त्याला मंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मी मंत्रीमहोदयाकडे जिमखाना मैदानाची जागा द्यावी अशी कधीही मागणी केलेली नाही याचा पुनुरोच्चार निंबाळकर यांनी केला.
बाजाराची जागा योग्य असल्याचे १२०० लोकांचे स्वयं घोषणापत्र लोकांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केले आहे. कपडे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ फळे हि सगळी दुकाने एकाच ठिकाणी असावीत असा आग्रह हॉकर्स फेडरेशनचा कायम राहिला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि विक्रेत्यांच्या गाड्यांची पार्किंग, किंवा खरेदीदारांच्या वाहनांची व्यवस्था या सगळ्या गोष्ठी एकत्र मिळाल्या तरच त्याला आठवडा वाजार म्हणता येईल, मात्र, मंत्री दीपक केसरकर यांची बाजाराची संकल्पनाच वेगळी आहे. प्रस्तापित लोकांचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री महोदय हॉकर्सच्या व्यापाऱ्यांना शुद्र लेखतात अशी टीकाही निंबाळकर यांनी केलीय. योग्य जागेसाठी आम्ही आग्रही होतो आणि राहणार, योग्य जागा मिळेपर्यंत आहे त्याच जागी तळ्याच्या काठी बाजार भरवला जाईल तसेच हॉकर्स युनिअन कोणतीही दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा संघटनेने दिलाय.