नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा…!

दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. तर सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. आता अशातच त्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

जिओ स्टुडिओचा इन्फिनाईट टुगेदर हा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जिओ स्टुडिओची निर्मिती असलेल्या विविध भाषांमधील आगामी १०० चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यावेळी नागराज मंजुळे यांनी देखील त्यांच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे हा त्यांचा चित्रपट म्हणजे एका महान खेळाडूचा बायोपिक असेल.