देवगड – पडेल इथं सायबर क्राईमविषयक पथनाट्याचं सादरीकरण…

109

देवगड : सिंधुदुर्ग पोलीस दलमार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे संकल्पनेनुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांचे मार्गदर्शनाखाली देवगड व विजयदुर्ग पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे कडून देवगड बस स्थानक व पडेल हायस्कूल पडेल येथे सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले .
सदर अभियाना अंतर्गत सायबर क्राईम विषयी घडणारे गुन्ह्याबाबत वैगवेगळी पथनाट्ये सादर करण्यात आली.तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस बँड त्यांचे वाद्य संगीत ठेवून कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री सचिन बम्बानी यांनी सायबर फ्राॅडविषयी मार्गदर्शन केले तसेच अँड श्रीमती परांजपे यांनी विधी सेवा प्राधिकरण मार्फत संविधान व आपले अधिकार याविषयी माहिती दिली.
देवगड कॉलेजचे कुर्लीकरसर, शेटे सर, चिंदरकरसर, देवगड बस स्थानक व्यवस्थापक सैतवडेकर व देवगड विजयदुर्ग हददीतील प्रतिष्ठित नागरिक , देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे
आदी यावेळी उपस्थित होते