डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती दीक्षाभूमी नागपूर येथे साजरी.!

61

दीक्षाभूमी नागपूर : संविधान निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती त्यांच्या जयंती निमित्त नागपुरातील दीक्षाभूमी येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष नागार्जुन सुरई ससाई, सचिव सुधिर फुलझेले, विश्वस्त विलास गजघाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळेला स्मारक समितीच्या सदस्यांनी स्तुपात जाऊन बाबासाहेबांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत बुद्ध वंदना करण्यात आली. दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठया प्रमाणात गर्दी केलेली दिसत होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील दीक्षाभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण अभिवादन केले. नागपुरातील संविधान चौक येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळेला भाजप शहर अध्यक्ष आणि आमदार प्रविण दटके, आमदार मोहन मते यांच्यासह अनेक पदाधिकारी उलस्थित होते. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देखील त्यांना यावेळेला अभिवादन करण्यात आले.