सिंधुदुर्गनगरी : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ओरोस येथे आज एकावर कारवाई केली आहे. यात त्याच्याकडून तब्बल ६० लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हाशिम कासम शेख (वय ६१, रा. सांताक्रुझ-मुंबई) असे त्याचे नाव आहे.
या कारवाईत तब्बल १ हजार दारुचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाई विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे व योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.





