कणकवली : ७२खेड्यांचा अधिपती, कोकणातील जागृत देवस्थान, माहेरवासिणींच्या हाकेला धावणारा श्री देव गांगेश्वर ( गांगोचाळा) चा ७ एप्रिल रोजी वर्धापनदिन होत आहे. या कार्यक्रमानिमित्त गणेश पूजन व अभिषेक होणार आहे. तसेच सकाळी १० ते १ यावेळेत धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वा. देवतरंगासह देवालय प्रदक्षिणा, ७ ते ८ वा. हरिपाठ, ८ ते १० वा. गावातील स्थानिक भजने, रात्री १० वा. महिला भजन डबलबारीचा जंगी सामना बुवा सौ. ऋतुजा पाळेकर, ( मालविर भुतनाथ महिला प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडी – देवगड) व बुवा सौ. योगिता पवार (श्री देव केसरकर प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे, ता. कुडाळ) असे विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धापनदिनानिमित्त करण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गांगेश्वर उत्सव समिती, बारापाच मानकरी व ग्रामस्थ मंडळ लोरे नं. १ च्या वतीने करण्यात आले आहे.





