धक्कादायक ..! भुईबावडा घाटात चालता ट्रक जळून खाक | चालक व क्लिनर बालंबाल बचावले

133

वैभववाडी : बांबू चिवा काटी घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. बर्निंग ट्रकचा थरार गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटात घडला. ट्रक चालक व क्लिनर बचावले असून भुईबावडा घाटातील वाहातूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शेर्पे येथून सांगलीकडे चिवा काटी भरुन भुईबावडा घाटातून हा ट्रक सांगलीकडे जात होता. ट्रक भुईबावडा घाटातून जात असताना गगनबावड्यापासून मागे ३ कि.मी.अंतरावर ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकचालक व क्लिनरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. माञ आगीने उग्र रुप धारण केल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

दरम्यान या आगीत ट्रक जळून खाक झाला. घटनेची माहीती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, कुलदीप पाटील, राहुल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घाटातील वाहातूक ठप्प झाली होती.आग विझविण्यासाठी पोलिसांनी कणकवली येथील अग्नीशामक बंब पाचरण केला. माञ सायंकाळी उशीरापर्यंत बंब पोहला नव्हता. त्यामुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.