वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हनुमान जन्मदिन साजरा करण्यात आला. वेंगुर्ले येथील हनुमान मंदिरात पहाटे हनुमानाची विधीवत पूजा केल्यानंतर मंदिरामध्ये हनुमान जन्म सोहळ्यावर किर्तन सांगण्यात आले. यानंतर मारुती जन्म सोहळा साजरा करण्यात आला. मारुती जन्मदिनानिमित्त मंदिरात विविध झाडे, फुले व फळे यांची मंदिरात सजावट केलेली होती. विशेष म्हणजे राम, सीता व हनुमान फळ हे सजावटीत लक्षवेधी ठरत होते मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई अधिकच शोभा वाढवणारी ठरत होती.





