नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीला यश | ओव्हरब्रिजखाली बच्चे कंपनीला खेळांचा आनंद लुटता येणार..!

80

कणकवली : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फ्लायओव्हर ब्रिजखाली दुतर्फा सर्व्हिस रोडच्या मधील जागेत अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला मिळणार आहे. आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या मागणीनुसार हे छोटेखानी मैदान उपलब्ध होणार असून आ. नितेश राणे यांच्या हस्ते आज श्रीफळ वाढवण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंड्या गांगण, सुशील पारकर, नगरसेवक विराज भोसले, रघुनाथ नाईक, आनंद पारकर, गौरांग खानविलकर आदी उपस्थित होते. अंडरआर्म क्रिक्रेट तसेच फुटबॉल प्रेमींना फावल्या वेळेत या जागी खेळाचा आनंद घेता येणार आहे. यासाठी दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूने सुरक्षेसाठी नेट लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे चेंडू नेट बाहेर जाणार नाही. याचा फायदा बच्चे कंपनीसह शहरातील क्रीडापटूंना होणार आहे.