नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका…

142

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर ठाणे कासारवडवली येथील ऑफिसमधुन सुटण्याच्या वेळी शिंदे गटाच्या महिलांनी ऑफिस मध्ये घुसून हल्ला केला होता. रुग्णालयात दाखल रोशनी शिंदे यांची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी फडतूस गृहमंत्री असा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सडकून टीकेनंतर भाजपआमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडल आहे. पोलिसांच्या गरड्यामध्ये आमच्या देवेंद्ररांना फडतूस कोणीही म्हणेल, दहा मिनिटे पोलिसांचा गराडा बाजूला ठेवा, संरक्षण बाजूला ठेवा आणि मग फडतूस म्हणण्याची हिंमत तर करा . मच्छर मारण्याची हिंमत नाही. मोठ्या मोठ्या बाता करण्याची हिंमत करता तर त्यांना मी एवढेच सांगेन यापुढे चड्डीत राहायचं आणि लायकीत राहवून बोलायचं. अशी जहरी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.