Home आंतरराष्ट्रीय परफेक्ट अकॅडेमीला सर्वोत्तम आदर्श अकॅडमी ॲवॉर्ड.!

परफेक्ट अकॅडेमीला सर्वोत्तम आदर्श अकॅडमी ॲवॉर्ड.!

166

प्रा. राजाराम परब यांना नवराष्ट्र सन्मान पुरस्कार प्रदान

कुडाळ : भारतातील मीडिया क्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या नवभारत समूहाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नवराष्ट्र दैनिकाच्या वतीने देण्यात येणारे महाराष्ट्र नवराष्ट्र सन्मान कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात नुकतेच प्रदान करण्यात आले.
यंदाच्या नवराष्ट्र सर्वोत्कृष्ट अकडेमी पुरस्कार कोकणातील अव्वल असलेली व नीट, जेईई सारख्या अवघड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करणारी परफेक्ट अकॅडेमी यांना आदर्श अकॅडेमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अकॅडमीचे संस्थापक व सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांना माजी खासदार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अकॅडेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कुडाळ नगरीच्या नगराध्यक्ष आफ्रीन करोल, तहसीलदार अमोल पाठक, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, नवराष्ट्र दैनिकाचे मुख्य संपादक नरेंद्र कोठेकर, जनरल मॅनेजर सचिन फुलपगार, नवराष्ट्र दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक विजय वीर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, प्राध्यापक राजाराम परब यांनी यापुढेही कोकणातील गोरगरिबांच्या मुलांना, तसेच ज्यांना आपल्या आवडीनुसार करिअर करण्यासाठी अकॅडेमीची गरज असेल, अशा ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करून, त्यांचे भविष्य उज्वल करण्याची ग्वाही दिली.


प्राध्यापक परब यांच्या वाटचालीचे व परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.