दु:खद प्रसंग असुनही रक्तदान करुन नारायण नाईक यांनी दिला समाजासमोर एक वेगळा आदर्श

321

नाईक कुटुंबियावर ओढवलेल्या दुख:द प्रसंगी सुद्धा या कुटुंबातील चार सदस्य यांनी केले रक्तदान.!

बांदा : म्हणतात ना रक्तदान जीवनदान या प्रमाणेच आपल्यावर व कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगीही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने रोणापाल येथील श्री नारायण नाईक या युवकाने रक्तदान केले. जन्मदाती आई हीचे दोन दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असे असूनही समाजात एक नवा आदर्श देत नारायण नाईक यांनी आजच्या रोणापाल येथील प्रकाश गावडे मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात येत रक्तदान केले.

दोन दिवसापूर्वी नारायण नाईक यांच्या आईचे दु:खद निधन झाले. एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नारायण नाईक व कुटुंबातील सिद्धेश नाईक, कल्पेश नाईक, प्रथमेश नाईक सदस्यांनी सुद्धा शिबिरात रक्तदान केले. यामध्ये सिद्धेश नाईक प्रथमेश नाईक कल्पेश नाईक यांच्या त्या काकी होत्या. नारायण नाईक यांच्या आईचे निधन झाले आणि नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता तरी अशाच परिस्थितीमध्ये समाजामध्ये एक नवा आदर्श देत या नाईक कुटुंबातील सर्व सदस्यांनी या शिबिरामध्ये येत रक्तदान केलं खरोखरच या कुटुंबियांचं समाजामध्ये एक नवा आदर्श दाखवून दिला. कारण रक्तदान केल्याने एखाद्या आजारी व्यक्तीला जीवनदान मिळत असते. या कुटुंबीयांचे मंडळाकडून कौतुक करण्यात आले.