लकी ड्रॉ च्या भूलथापांना बळी पडताय तर सावधान | कणकवलीत काहींची झालीय फसवणूक

587

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहरात चोरीचे सत्र सुरू असताना आता नवी टोळी कणकवली शहरात दाखल झाली आहे. एम. एच. १२ डी वाय ३६७७ श्री एन्टरप्राइजेस स्क्रेच अँड डिस्काउंट ऑफर कूपन अशी लकी ड्रॉ ची कुंपण घेऊन फिरत असलेली ही टोळी आहे. साधारणपणे कणकवली शहरात बऱ्याच लोकांना या टोळीने हजारो रुपयांना गंडा घातला असून आपल्याला लागलेले कुपण वस्तू आपणास २ दिवसांत मिळेल असे सांगून सदरच्या व्यक्ती पैसे घेऊन फरार होतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीच्या गोष्टींना आकर्षित होत असाल तर वेळीच आवर घाला. अन्यथा तुमची ही फसवणूक होऊ शकते.

प्रामुख्याने या टोळीमध्ये ५ स्त्रिया आणि २ पुरूष आहेत. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. तसेच ते एकावर एक वस्तू फ्री आहेत म्हणून सांगत आहेत. त्यामध्ये फ्री वस्तू आम्ही संध्याकाळी घेऊन येतो असे सांगून फसवणूक करत आहेत. एका फसवणून झालेल्या अशाच कणकवली शहरातील व्यक्तीकडून त्यांचा मोबाईल नंबरही हात लागला आहे. त्यावर एकदा फोन केला की दुसऱ्या वेळे नंबर ब्लॉक केला जातो. देशकहो सावधान अशा भूलथापांना बळी पडू नका. अन्यथा तुमचे होणार मोठे नुकसान…! जर अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू किंवा ऑफर्स घेऊन कोणी आपणा जवळ आले तर वेळीच सावध होऊन नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करून घटनेची माहिती द्या. असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत कणकवली पोलीस देखील माहिती घेत असून संदर्भात मिळालेल्या गाडी नंबर चा तपास सुरू आहे तर हाती आलेल्या एका टोळीतील महिलेच्या नंबरचा देखील तपास कणकवली पोलीस करत आहेत. अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येतेय. त्यामुळे  पोलिसांकडून या गोष्टी बंद होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात हे पाहाण महत्वाचे ठरणार आहे.