कणकवली : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन दिनांक 5 एप्रिल रोजी 4:00 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे स्वागत आमदार नितेश राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेश राणे यानी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या सहकार्याने भव्य रंगमंचावर सावरकर लिखीत पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, क्रांती गीते, हिंदु गौरव गीते यावर आधारित “सावरकर गौरव ” हा कार्यक्रम सादर होणार आहे. सावरकर प्रतिष्ठान चे नामवंत कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. सावरकरांचे राष्ट्रवादी विचार, हिंदु तत्वज्ञान घरा घरात पोचावे म्हणून आमदार नितेश राणे प्रयत्न करत आहेत. या सावरकर गौरव यात्रेत सर्वानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.





