मिठबाव रामेश्वर मंदिरात रामनवमी उत्सव दिमाखात..!

देवगड : श्री रामेश्वर उत्सव समिती मिठबाव तांबळडेग कातवण यांच्यावतीने गुरुवार दि ३० मार्च २०२३ रोजी रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री देव रामेश्वर मंदिर मिठबाव येथे करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री रामेश्वर मंदिरात अभिषेक , सकाळी १० ते १२ कीर्तनकार के डी सावंतसर यांचे कीर्तन ऐकण्यात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.

दुपारी १२ महाआरती व त्यानंतर १ वाजता महाप्रसाद आदी सकाळच्या सत्रात तर संध्याकाळच्या सत्रात ५ ते ६ यांचे स्वरसुधा क्रिएशनचा भक्ती संध्या कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ८ गायन रात्री ८ ते ९ भजन व रात्री ९:३० ते १२ मराठमोळा नजराना कलांकर ग्रुप मालवण आदी कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले. श्री देव रामेश्वर हे मिठबाव तांबळडेग कातवण या तीन गावांचे ग्रामदैवत असून या तिन्ही गावातील लोकांनी एकत्र येत यावर्षी पासून प्रथमच श्री देव रामेश्वर मंदिरात श्री रामेश्वर उत्सव समितीच्या माध्यमातून रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला.