बांदा संत सोहिरा मठात आज श्रीराम नवमी व  नाथांचा निर्याणदिन सोहळा..!

76

बांदा : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात आज गुरुवार दि.30 मार्च रोजी श्री रामनवमी उत्सव व संत सोहिरोबानाथ निर्याण दिन साजरा करण्यात येणार आहे. श्री रामनवमीच्या दिवशी उज्जैन येथे संत सोहिरोबानाथांचे सदेह निर्याण झाले.त्यामुळे य़ा दिवशी नाथांचा निर्याणदिन साजरा होतो.

यानिमित्त सकाळी नाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा,अभिषेक ,एकादशणी होऊन तीर्थ प्रसादास आरंभ  होईल.संत सहिरा चरित्रामृताचे पठण होईल त्यानंतर श्रीरामनाम जप होईल.दुपारी ठिक 12 वाजता श्री रामजन्म सोहळा होईल.सायंकाळी 5 वाजता महिलांची भजनसेवा.7.15 वाजता नित्य सायंआरती  रात्रौ 7.30 वाजता नित्य सेवेकरी मंडळींची भजनसेवा होणार आहे.श्री गुरुप्रतिपदेपासून आरंभ झालेल्या नाथ सेवा उत्सवाची श्री रामनवमीला सांगता होणार आहे.भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्री संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुका दर्शना व तीर्थप्रसादाचा   लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सोहिरोबानाथ आंबिये मठातर्फे करण्यात आले आहे.