दापोली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण सुरू केले असून बाळासाहेबची विचारधारा सोडणाया ठाकरे गटावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तसेच यावेळी ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे जुने व्हिडिओ येथे दाखवण्यात आले.
'Laav re to video' | Chief Minister attacked the Thackeray group
यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले की हे आलेलं भगवं वादळ ‘लोकांना’ दाखवा असे सांगत उद्धव ठाकरेंवर देखील चांगलाच हल्लाबोल केला आहे. गेल्या आठवड्यात याच मैदानात एक आपटी बार, फुसका बार देखील येऊन गेला. मी काय त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. कारण उत्तर हे आरोप किंवा टीकेला द्यायचं असतात . पण तोच तो थयथयाट, तीच आदळआपट याला काय उत्तर देणार? असं देखील शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत देखील गेल्या सहा महिन्यांपासून अशीच आदळआपट, थयथयाट चालू आहे. तोच खेळ चालू आहे, फक्त जागा बदलली होती. अशी धिंड निघाली आहेत. त्यांचे सर्कशी प्रमाणे संपूर्ण राज्यभर शो होणार आहे. तेच टोमणे, तेच आरोप … हे सर्व तेच चालू राहणार आहे. फक्त जागा बदलत जाईल. त्यांच्या कडे २ च शब्द आहेत खोके आणि गद्दार हेच शब्द भांडार आहेत.





