नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू..!

61

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील नेवली दाभिल येथील आकाचो ( गुनो) येथील नदीत युवकाचा मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. जितेंद्र उर्फ राजू उत्तम तारी (वय ३३ रा. ओटवणे,तारीवाडी) असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. वयस्कर व आजारी आई वडीलाचा एकुलता एक कमवता मुलगा गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यांचे मे महिन्यात लग्न ठरलेले आहे.

The youth who went to catch fish on the river drowned..!

बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, नेवली दाभिल येथील (आकाचो गुनो) येथील नदीत रविवारी दुपारच्या सुमारास  मृत जितेंद्र हा मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेला होता. जितेंद्र हा खोल पाण्यात  मासे पकडण्यास उतरला असता वरचा आला नाही.त्यानंतर  सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्यास मदत केली. मात्र तो कोणाच्याच हाती लागला नाही. यांची माहीती ओटवणे व नातेवाईकांना  व बांदा पोलिसांना देण्यात आली.
ब‍ांदा पोलीसांनी घटना स्थळी येत पर्यंत शोधमोहीम राबवली. सायंकाळी ७ वाजता पोलिस कर्मचारी  बाळकृष्ण गवस यांनी खोल पाण्यात उतरुन मृतदेह बाहेर काढला. बांदा पोलिस निरिक्षक शामराम काळे, उपनिरिक्षक समिर भोसले, पोलिस कर्मचारी विजय जाधव, बाळकृष्ण गवस, मोरजकर यांच्या मदतीने शवविच्छेदनासाठी मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. मयत जितेंद्र हा हुशार मनमिळाऊ स्वभाव होतो. तो गेली बरीच शिरोडा,वेगुर्ला  येथून मासे आणून ओटवणे परिसरात मासे विक्री करण्याचा व्यवसाय करत होता.

फोटो : मृत जितेंद्र उर्फ राजू उत्तम तारी