देवगड : जामसंडे शांतीनगर येथील गीता संतोष कराडे या विवाहितेने घराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. ही 18 रोजी रात्री नऊच्या सुमाराची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार गीता संतोष कराडे(३१) ही महिला पती व मुलांसमवेत शांतीनगर जामखेड येथे राहत होती तिचे पती संतोष कराडे हे इमारतीत सेंटरिंग चे काम करत असून सायंकाळच्या सुमारास या महिलेचे वडील व भाऊ तिला भेटण्यासाठी देवगड येथे आले होते.
दोघेही रात्री जेवण करून करत असताना गीता घरात दिसली नाही म्हणून त्याची शोधा शोध केली असता घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडून आला. याबाबतची खबर पती संतोष कराडे यांनी देवगड पोलिसात दिली दिली असून आकस्मिक मृत्यू अशी नोंद देवगड पोलीसांनी आली आहे. याबाबतचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.





