कणकवली | मयुर ठाकूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून पाऊस पडणार असल्याचे बोलले होते. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे १६ व १७ मार्चला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता ग्रामीण कृषी मोसम सेवा उद्यान विद्या महाविद्यालय मूळदे कडून वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे ताशी ३० ते ४० किमी वेगाचा सोसाट्याचा वारा आणि मेघ गर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
Chance of rain in Kankavli ?| The atmosphere resembled rain
मात्र रविवारी दुपारी १२ वाजलेनंतर चे वातावरण हे पाऊस सदृश्य झाले असून. कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कणकवली तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सदृश्य स्थिती आणि वातावरणात देखील तसा बदल झाला आहे.
त्यामुळे आता आंबा – काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कुठेतरी आंबा – काजू पिक शेतकऱ्यांच्या हाती येत होते मात्र पाऊसपूर्वी मळभ मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणात देखील पाऊस सदृश्य बदल झाले आहेत.





