देवगड : श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मिठबाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथे गुरुवार 23 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ ते ९ अभिषेक सकाळी ९ ते ११ श्री स्वामी सारामृत पोथी पारायण ,सकाळी १० ते १२ सत्यनारायण पूजा, दुपारी १२ ते १२:३० आरती व मंत्रपुष्पांजली, दुपारी १२:३० ते १ ब्राह्मण भोजन, दुपारी १ ते २ महाप्रसाद सायंकाळी ४ ते ५ श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळाचे सूश्राव्य भजन सायंकाळी ५ ते ७ श्रींची पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ मठ विठ्ठल मंदिर पर्यत सायंकाळी ७ ते ७:३० महाआरती रात्री ९ ते १२ सुश्राव्य गायन कार्यक्रम सादर करते सुधांशू सोमण,आदी कार्यक्रम श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथे संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाच्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने विजय काळे यांनी केले आहे.





