जामसंडेत 23 मार्चला माझे माहेर पंढरी नाटक….

64

देवगड : स्वामी समर्थ भक्त मंडळ आणि परिवार जामसंडे यांच्या वतीने समर्थ मॅंगो एजन्सी शांतीनगर जामसंडे येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा कार्यक्रम गुरुवार 23 मार्च 2033 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त पहाटे ४ ते ५ स्वामींची पाद्यपूजा, सकाळी ६ ते ७ होमहवन, सकाळी ७ ते १० सत्यदत्त पूजा, सकाळी १० ते ११ नामस्मरण आणि गुरुचरित्र वाचन सकाळी ११ ते १२ ढोल पथक वादन, दुपारी १२ ते १२:३० स्वामींची महाआरती ,१२:३० पासून महाप्रसाद ,सायंकाळी ४ ते ६ दिंडी सायंकाळी ७ ते ८ आरती रात्री ८ ते ९ स्थानिक कलाकारांचा गायन कार्यक्रम , रात्री दहा वाजता अमृतनाथ दशावतार म्हापण यांचे ट्रिकसीन नाटक माझे माहेर पंढरी आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे असे आवाहन भरत गोगटे व समस्त स्वामी समर्थ भक्त मंडळ आणि परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.