स्वामी समर्थ प्रकट दिन व मठाच्या चौथा वर्धापनदिनाच्या हो निमित्ताने केले आयोजन
देवगड : तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन व स्वामी समर्थ मठाच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून २२ ते २४ मार्च या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी मठाचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ मठात प्रथमचं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील सत्वयुक्त देवीची दोन दिवस स्थापना तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना प.पु. जगतगुरु शंकराचार्य महाराज करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानिमित्ताने होणारे कार्यकम २२ मार्च २०२३ सायं. ४.०० वा. पालखी सोहळा श्री देवी पावणादेवी मंदिर शिरगाव ते श्री स्वामी समर्थ मठ हडपीडपर्यंत, सायं ८.०० वा. महाराष्ट्राच्या साडेतीन देवी शक्तिपीठांचे श्री स्वामी समर्थ मठात आगमन. गुरुवार २३ मार्च २०२३ सकाळी ५.०० वा.गणेश पूजन, पादुका पूजन, सकाळी ७.०० वा.श्री सत्यनारायण महापूजा,सकाळी ९ वाजता प.प. जगतगुरु शंकराचार्य महाराज करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या नूतन चरण पादुकांची प्रतिष्ठापना तसेच साडेतीन शक्तिपीठांच्या सात्विक महादेवींची दोन दिवसीय स्थापना,सकाळी १०.०० वा. लघुरुद्र,दुपारी १२.०० वा. पालखी सोहळा,दुपारी १२.३० वा. महाआरती,दुपारी १.३० वा. महाप्रसाद,दुपारी ३.०० वा.श्री प्रशांत पाटोदेकर यांचा सुस्वर गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी ६.०० वा.देवींचा आविष्कार सखी परिवार (कोकण कट्टा), रात्रौ ८.०० वा.महाराष्ट्राची लोकधारा इंद्रायणी ग्रुप सावंतवाडी. शुक्रवार २४ मार्च २०२३ सकाळी ८.०० वा. देवींची पूजा,सकाळी १०.०० वा. कुंकुमार्चन,दुपारी १२.०० वा. महाआरती,दुपारी ९.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (सर) नाशिक यांचे व्याख्यान, सायं. ५ वा. नामस्मरण, सायं ६ वा. गोंधळ आणि इतर भक्तीचे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.





