उद्या आ. नितेश राणे घेणार “जलजीवन मिशन” चा आढावा.!

56

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी देशभरामध्ये राबवलेल्या “जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ” ही योजना सद्या मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजनेच्या स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणी जाणून घेवून त्यावर उपाय योजना करण्यासाठी स्थानिक आमदार नितेश राणे शनिवार १८ मार्च रोजी प्रहार भवन, कणकवली येथे दुपारी १.०० वाजता बैठक घेणार आहेत.

या योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा बनविला असून त्यामधून गावातील सर्व वाडी वस्त्यांना मुबलक व पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सद्या या कामांना सुरूवात करण्यात आलेली आहे. परंतु स्थानिक पातळीवर बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहे. या सर्व अडचणी दूर करून जलजीवन योजना कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार नितेशजी राणे यानी उद्या आढावा घेणार आहेत . या बैठकीला कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत.