पोलिस बंदोबस्तात स्टॉल हटविण्यात येणार असल्याने स्टॉल धारकांच्या भूमिकेकडे लक्ष!
कणकवली : कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखाली लागलेले शेकडो अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आली आहे. १७ व १८ मार्च या दोन दिवसात स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यासंबंधी स्टॉल धारकांनाही लेखी नोटीसा बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र दिल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्ताची रंगीत तालीम देखील केली.
एकंदरीत परिस्थिती पाहता ओव्हर ब्रिज खालील स्टॉल धारकांच्या किंवा भाजी विक्रेत्यांच्या बैठका नगरपंचायत प्रशासनाच्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या. नगरपंचायत प्रशासनाने स्टॉल धारकांना फ्लायओव्हर ब्रिजखाली भाजी विक्रीचे स्टॉल लावणे, संदर्भात सूचना देऊन भाजी विक्रेत्यांना एकत्रित आणणे आणले होते. मात्र आताची वस्तुस्थिती पाहता सर्व स्टॉल धारक तसेच भाजी विक्रेते हे ओव्हरब्रिज खाली बसत आहेत. हायवे प्राधिकरणाने अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे आता स्टॉल धारक नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यामध्ये देखील अशाच प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. स्टॉलधारकांना अनेक वेळा त्या ठिकाणी आंदोलने, उपोषणही करून लोकप्रतिनिधींसोबत बैठका घ्याव्या लागल्या होत्या. कणकवली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी आता नेमकी प्रशासन काय भूमिका घेते ? आणि त्याला स्टॉल धारक स्टॉल हटाव मोहिमेला सहकार्य करतील काय ? अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या कणकवलीत सुरू झाल्या आहेत. हायवे प्राधिकरणचे अधिकारी देखील कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र देऊन तशा पद्धतीचा कणकवली पोलीस आणि बंदोबस्त देखील तैनात ठेवलेला आहे. एकंदरीत वस्तुस्थिती पाहिली तर सर्व स्टॉल धारक ह्या मोहिमेला सहकार्य करतील का ? की विरोध करतील असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत.





