कणकवली : स्वाभिमानी गुरव मित्रमंडळ कलमठ गुरवाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कलमठ गुरववाडी येथे रविवारी १९ मार्च ३०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तसेच १९ मार्च रोजी सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी ३ वा. होम मिनिस्टर ( खेळ पैठणीचा ), सायंकाळी ६ ते ७ वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह. भ. प. श्री. चिंतामणी सामंत बुवा भोगवे शेळपी ( तालुका वेंगुर्ले यांचे श्री श्राव्य कीर्तन ), तर रात्री ९ वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले यांचा ( मकर संक्रांतीची महती सांगणारा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग माता नंच तू वैरीणी ) असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी गुरव मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.





