आंबोली घाटातील अवजड वाहतूकिचं गौडबंगाल काय? | कोणाचा वरदहस्त..?

72

सावंतवाडी : तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले एक रम्य पर्यटन स्थळ म्हणून आंबोली घाटातील धबधब्याचे वर्णन केले जाते. पावसाळ्यात येथे परजिल्ह्यातील पर्यटक येतात. कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी व मुख्य धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते.

या हंगामात आंबोली येथील हॉटेल व्यवसाय हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात चालतो, धबधब्याच्या एका बाजूने गावातील लोकांचा हॉटेल व्यवसाय सुरू असतो. पण जेव्हा पावसाळ्यात दरड कोसळली जाते तेव्हा आंबोली घाटातील वाहतूक बंद ठेवावी लागते. एकंदरीत या बाबत माहिती घेतली असता अवजड वाहनांची रहदारी ही संबंधित शासकीय खात्याने बंद केली असून, सुद्धा रात्रीच्या वेळीस वाफोली रोड ते आंबोली बस स्टँड दरम्यान दोन पोलिस तपासणी बंदोबस्त तैनात असलेल्या या सावंतवाडी ते आंबोली घाटातील अवजड वाहतूक होतेच कशी? याबाबत जबाबदार शासकीय अधिकारी यांनी वेळीच बंदोबस्त करावा जेणे करून सर्वसामान्य जनतेचे व्यवसाय सुरू राहतील.

सावंतवाडी बाजारात भाजीपाला, फळे, कडधान्य ही घाटमाथ्या वरूनच वाहतूक होते. तसेच सदर घाटातील काही भाग हा फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे योग्य वेळेस नियोजित दुरुस्ती करण्यास शासनालाही अडथळे निर्माण होत आहेत. भविष्यात आंबोली घाटातील वाहतूक बंद होऊ नये यासाठी शासनाने या प्रकरणातील वरदहस्त यांचा तपास घेवून घाटातील अवजड वाहनांची अनधिकृत वाहतूक त्वरित थांबवावी व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहन चालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे.