कणकवली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून पाऊस पडणार असल्याचे बोलले जात आहे. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणपणे १६ व १७ मार्चला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता ग्रामीण कृषी मोसम सेवा उद्यान विद्या महाविद्यालय मूळदे कडून वर्तविण्यात आली आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाचा सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे आता आंबा – काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच कुठेतरी आंबा – काजू पिक शेतकऱ्यांच्या हाती येत होते मात्र पाऊसपूर्वी मळभ मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरणात देखील मोठे बदल झाले आहेत.





