भारतीय सैन्याची अजोड कारवाई | ३७० पर्यटकांची केली सुटका

227

सिक्कीम : पूर्व सिक्कीममधील अतिवृष्टीमुळे रविवारी नाटू ला आणि त्सोमगो (चांग्गु) तलाव भगत अडकलेल्या 370 पर्यटकांची भारतीय लष्कराने सुरक्षित सुटका केली. स्थानिक पोलिस आणि नागरी प्रशासनाने मदतकार्यासाठी लष्कराला साद दिली . लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या तुकड्या ताबडतोब कृतीत आल्या आणि बचाव मोहीम “ऑपरेशन हिमराहत” सुरू केली आणि सर्व 370 पर्यटकांची सुरक्षितपणे सुटका केली .याबाबतची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे .