देवगड नांदगाव मार्गावर अपघात…!

499

देवगड : देवगड नांदगाव मार्गावर देवगडहून भरगाव वेगाने नांदगावच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने नांदगावहून देवगडच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारला जोरदार धडक बसली . वरील कार व रिक्षा यांच्यात अपघात होऊन आतील प्रवासी जखमी झालेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रचना राजेंद्र धुरी वय 40 राहणार तळवडे धुरीवाडी, तालुका देवगड, जि सिंधुदुर्ग यांनी या अपघाताबाबत फिर्याद दिली आहे. शनिवार सकाळी 11 च्या मानाने देवगड निपाणी जाणाऱ्या रोडवर जामसंडे खाकशी मुख्यमार्गावरील पुढील बाजूस असलेल्या वळणावर अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचालक अभिजीत पुजारी वय 35 राहणार नाडन तालुका देवगड यांच्या ताब्यातील MH 07 – B- 7547 या रिक्षाने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरगाव वेगाने रिक्षा चालविल्याबद्दल समोररून येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक MH 07 AB 1352 या कारला धडक दिल्याने फिर्यादी व त्याच्या मुलीस तसेच दशरथ चव्हाण पोलीस उपनिरीक्षक (ग्रेड) देवगड यांना दुखापत होऊन दोन्ही गाड्यांचे नुकसान होऊन स्वतःच्या गंभीर व किरकोळ दुखपतीस कारणीभूत झाला. म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .