बांदा : जागतिक महिला दिन 8 मार्च या दिनानिमित्त विविध क्षेत्रातील आपल्या अंगभूत गुणाने वेगळा ठसा उमट उमटवलेल्या महिलांचा सन्मान होणार आहे. महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी संध्याकाळी साडेचार वाजता विठ्ठल रखुमाई हॉल बांदा येथे नारी शक्तीचा सन्मान हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदा यांनी केले आहे.





